चेन्नई- प्रसिद्ध तमिळ अभिनेते बिजिली रमेश यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले.ते अवघ्या ४६
वर्षांचे होते.बिजिली रमेश यांचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते.
‘नटपे थुनाई’, ‘अदाई’ और ‘शिवप्पु मंजल पचाई’ सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले होते.ते अभिनेते रजनिकांतचे खूप मोठे चाहते होते. सोशल मीडियावरही त्यांची प्रचंड फॅन फॉलोविंग होती. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांना धक्का बसला आहे.अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.अभिनेते बिजली रमेश हे मागील काही वर्षांपासून आजारी होते.काल त्यांची जास्तच तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बिजली रमेश यांचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते.एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या या आजाराचा खुलासा केला होता. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत कॉमेडी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.