प्रियांका गांधींची उद्या कोल्हापूरात ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभा

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची तोफ प्रथमच कोल्हापुरात धडाडणार आहे. या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. खासदार शाहू महाराज, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.