फडणवीस भिजलेले काडतूस
संजय राऊत यांची बोचरी टीका

मुंबई – उद्धव ठाकरेंनी माझा उल्लेख फडतूस असा केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी फडतूस नाही तर काडतूस आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. खासदार संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की ‘फडणवीस भिजलेले काडतूस आहेत. तुम्ही ईडी, सीबीआय हे तुमचे खरे काडतूस आहे, ते बाजूला ठेवून या, मग काडतूस कुठे घुसते ते सांगतो.’ तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या. तुम्ही काय करत आहात, असा थेट सवालही राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसाठी ’फडतूस’ हा अत्यंत सौम्य शब्द वापरला. हा शब्द मराठी भाषेतला प्रचलित शब्द आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला त्यापेक्षा कठोर भाषेत ‘नपुंसक’ असे म्हटले होते. डिक्शनरीमध्ये फडतूसचा अर्थ अर्थहिन, कवडीमोल आणि बिनकामाचा आहे. हे सरकारच बिनकामाचे आहे. त्याला फडतूस शब्द वापरला. त्यामुळे भिजलेले काडतूस एवढे आत घुसायचे कारण नाही.

Scroll to Top