फर्निचर कंपनीला भीषण आग!
७ ते ८ सिलेंडरचा स्फोट

पुणे – पुण्यातील धायरी येथे फर्निचर कंपनीला काल भीषण आग लागली. यात ७ ते ८ सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर सुमारे दोन तासांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पुण्यातील धायरी परिसरातील गल्ली क्र.२२ मधील फर्निचरच्या कंपनीला आग लागली. ही घटना काल संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते. आगीमुळे पाठोपाठ ७ ते ८ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. आग मोठी असल्याने तेथील परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.

Scroll to Top