फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन बोगींना भीषण आग‌

तेलंगणा- फलकनुमा एक्स्प्रेसच्या ३ बोगींना तेलंगणामधील पागिदिपल्ली – बोम्माईपल्ली यादरम्यान आग लागली. फलकनुमा एक्स्प्रेसच्या एस-४,एस-५, एस-६ या तीन बोगी जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी सुरक्षा साखळी ओढली त्यामुळे गाडी थांबली. या ट्रेन अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तेलंगणातील हैदराबाद येथे धावत्या बसलाही आग लागली. यावेळी बसमध्ये सुमारे ११ जण प्रवास करत होते. धूर येऊ लागल्याने प्रवाशी लगेच बसमधून खाली उतरले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top