सिंधुदुर्ग :
मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात पडत असलेल्या पावसाचा फटका राज्य महामार्गाला बसला. फोंडाघाटात दरड कोसळ्याने कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरड बाजूला करण्यात आली तरी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माघारी फिरणे पसंत केले.कोल्हापूरवरुन सिंधुदुर्गात जाण्यासाठी गगनबावडा व आंबोली असे दोन पर्याय घाट रस्ते उपलब्ध आहेत. कोकणात गणेशोत्सव ९ दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात सर्व मार्ग सुस्थितीत असणे आवश्यक आहे अशी मागणी प्रवशांनी केली आहे. दरड पुन्हा कोसळली तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.