फ्रान्समध्ये आयफोन १२ विक्रीवर बंदी रेडिएशन पसरवत असल्याचा आरोप

पॅरिस

फ्रान्समध्ये ॲपल कंपनीच्या आयफोन १२ वर बंदी घालण्यात आली आहे. आयफोन १२ घातक रेडिएशन (किरणोत्सार) जास्त प्रमाणात पसरवत असल्याचा आरोप फ्रान्स नॅशनल फ्रिक्वेन्सी एजन्सीने (एएनएफआर) केला आहे. आयफोन १२ मानकांपेक्षा अधिक रेडिएशन परसवतो असे या संस्थेचे म्हणणे आहे. हे रेडिएशन आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे सांगितले जाते.

आयफोन १२ या मॉडेलवर स्टँडर्ड अब्जॉर्प्शन रेट म्हणजेच युरोपियन युनियनकडून मान्यता असलेले किरणोत्सार मर्यादा जास्त असल्याचे आढळले आहे. या फोनमध्ये जास्त रेडिएशन आहेत, असे एएनएफआरने सांगितले. फ्रान्सच्या डिजिटल इकॉनॉमी विभागाचे मंत्री जीन बारोट म्हणाले की, ॲपलने या समस्येवर तोडगा न काढल्यास फ्रान्समधून आयफोन १२ चे सर्व मॉडेल परत पाठवण्यात येतील. या फोनमधील रेडिएशनची समस्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे दूर केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. मात्र, ॲपल कंपनीने आयफोन १२ च्या रेडिएशन संदर्भातील सर्व आरोप फेटाळत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आयफोन रेडिएशन संबंधित जागतिक नियमांचे पालन करतो. आयफोन १२ चे जुने मॉडेल २०२० मध्ये लाँच करण्यात आले होते. आयफोन १२ रेडिएशन संबंधित सर्व नियमाचे पालन करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top