बँकांमध्ये कोटींची बेनामी रक्कम! केंद्र सरकार वारसदारांच्या शोधात

नवी दिल्ली- भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचे पैसे बेवारस पडून आहेत. यात अनेक बँकांमध्ये जवळपास ३५,०१२ कोटींची रक्कम समाविष्ट आहे. मात्र यापुढे अशी बेवारस रक्कम बँकेत पडून राहू नये यासाठी केंद्रीय बँकेने नवे पाऊल उचलले आहे. त्यासाठी एक प्रणाली विकसीत करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या मदतीने ज्या रकमेचा कोणीच वारस नाही. अशा खातेधारकांच्या वारसांची माहिती काढून ती रक्कम त्यांना सुपूर्द केली जाईल.

बँकेत खाते उघडल्यानंतर या खात्यांमध्ये धारकांनी रक्कम जमा केली, तर काहींनी मुदत ठेव जमा केली, अशा खातेधारकांचा कालांतराने मृत्यु झाला. याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबियांना नसल्याने ही रक्कम तशीच पडून राहिली. मार्च २०२२ मध्ये ही रक्कम ४८,२६२ रुपये होती. मात्र, यापुढे अशी बेवारस रक्कम बँकेत पडून राहू नये यासाठी केंद्रीय बँकेने नवे पाऊल उचलले आहे. त्यासाठी एक प्रणाली विकसीत करण्यात येणार असून ती कृत्रिम बुद्धीमतेवर (एआय) काम करणार आहे. त्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात येणार आहे. या बेव पोर्टलमुळे ज्या रक्कमेवर दावा सांगण्यात आलेला नाही, त्याविषयीची योग्य माहिती समोर येणार आहे. तसेच सध्या कोट्यवधींची रक्कम पडून आहे, तिच्या वारसदारांचा शोध घेणे सोपे होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top