चंदीगढ – कर्नाटक निवडणुकीदरम्यान बजरंग दलाच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पंजाबच्या संगरूर न्यायालयाने समन्स बजावले आहे. संगरूरचे रहिवासी व हिंदू सुरक्षा परिषद व बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी दाखल केलेल्या या याचिकेत खरगे यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खरगे यांना 10 जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक निवडणुकीदरम्यान बजरंग दलाच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
बजरंग दलावर टीका खरगेंना कोर्टाचे समन्स
