बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जोरदार बर्फवृष्टीत भाविकांची गर्दी

देहराडून
लष्कराने बँडची धून वाजवत आज सकाळी सहा महिन्यांनंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. या मंदिराला 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. जोरदार बर्फवृष्टी सुरू असून देखील शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी जय बद्री विशालच्या घोषणा दिल्या.
चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे पारंपरिक रितीरिवाजानुसार खुले करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मंदिरातील पहिली पूजा करण्यात आली. संपूर्ण मंदिरावर झेंडुंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचर्य अविमुक्तेश्वानंद मंदिरात पोहोचले होते. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले झाल्यानंतर चारधाम यात्रेची आता औपचारिक सुरुवात झाली आहे.
बद्रिनाथ धाममध्ये अधूनमधून बर्फवृष्टी आणि पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भाविकांसाठी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता निवासाची व्यवस्था अगोदरच करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top