पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस चालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६) असे हत्या झालेल्या चालकाचे नाव आहे. जांभूळवाडी परिसरात शुक्रवारी (१५ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींना अटक केली आहे. अशोक कुंभार,रोहीत पाटेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेंद्र दिवेकर आणि त्यांचे मित्र अशोक कुंभार,रोहीत पाटेकर यांच्यामध्ये काही कारणास्तव किरकोळ वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आरोपी अशोक कुंभार, रोहीत पाटेकर यांनी राजेंद्र यांना मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र दिवेकर यांचा मृत्यू झाला.
बस चालकाची निर्घृण हत्या
