बांगलादेशात ऑक्सिजन प्रकल्पात
भीषण स्फोट! सहा जणांचा मृत्यू

चित्तगाँग :

बांगलादेशातील चित्तगाँगच्या सीताकुंडा उपजिल्हा परिसरात एका ऑक्सिजन प्रकल्पामध्ये शनिवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिकजण जखमी झाले आहेत. या ऑक्सिजन प्रकल्पात झालेला स्फोट इतका भयंकर होता की, घटनास्थळापासून दोन चौरस किलोमीटर परिसरातील अनेक इमारती हादरल्या.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. कामगारांना तातडीने बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केले. १२ जणांना प्रकल्पातून बाहेर काढले व तातडीने चटगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘ऑक्सिजन प्रकल्पात शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. स्फोट झाल्याची मा

Scroll to Top