वाडा- तालुक्यातील नांदणी-अमरभुई ग्रामपंचायतीने विहिर खोदण्यासाठी अलीकडे स्फोट घडवले आहेत.मात्र या स्फोटात नैसर्गिक पवित्र झरा उध्वस्त झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांना डबक्यातील गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने या विरोधात ग्रामस्थांनी वाडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या गावाच्या परिसरात पुरातन प्रभू झरा आहे. रामचंद्रांनी बाण मारून हा उत्पन्न केल्याचे मानले जाते. हा झरा कधीही आटत नाही. विहिरीसाठी स्फोट घडवले गेल्याने त्यात अविरत वाहणारा हा झरा उध्वस्त झाला आहे. इथल्या ग्रामस्थांना आणि जनावरांनाही डबक्यातील गढूळ पाणी प्यावे लागत आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने लोकांच्या विरोधात जावून जलजीवन मिशन योजनेंतर्गत ही विहिर खोदली आहे.पण त्यात हा झरा उध्वस्त झाला आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.
बाणगंगेचा झरा उध्वस्त! संतप्त ग्रामस्थांचे उपोषण
