बाणावलीतील देवस्थानचा लक्ष्मीपूजनोत्सव १ पासून

मडगाव – गोव्यातील बाणावली येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी देवस्थानचा श्री लक्ष्मीपूजनोत्सव सोहळा यंदा शुक्रवार १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
लक्ष्मीपूजनोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधी,आरत्या,पालखी मिरवणूक निघणार आहे. या पालखीचे कै.विष्णु रायकर यांच्या निवासस्थानातून मंदिरात आगमन होणार आहे. दुसर्‍या दिवशी २ नोव्हेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी आणि त्यानंतर धनुष्यबाण तयार करण्याची स्पर्धा आणि मुखवटा रंगवण्याची स्पर्धा होणार आहे. दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी सिनेगीतांचा कार्यक्रम होईल. शेवटच्या तिसर्‍या दिवशी धार्मिक विधी,आरत्या, सर्व स्पर्धांचा निकाल आणि पारितोषिक वितरण तसेच रात्री ‘स्वरधारा’ कार्यक्रम होणार आहे.