रत्नागिरी – प्रस्तावित ऑईल रिफायनरीसाठी बारसू आणि सोलगाव माळरानावर घेण्यात आलेल्या माती परीक्षणाचे काम तीन दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून रिफायनरी विरोधक आंदोलकांना रोखण्यासाठी लावलेला पोलीस बंदोबस्त देखील येथून हटवण्यात आला आहे. या रिफायनरीसाठी बारसू आणि सोलगाव येथील जमीन योग्य आहे की नाही, याचा अहवाल आता दोन महिन्यांनंतर येणार आहे.
माती परीक्षणाच्या कामाला बारसूसह आजबाजूच्या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलन केले. ग्रामस्थांनी उद्रेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला होता. त्यानंतरही बारसूच्या सड्यावर ग्रामस्थांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या छायेत सलग 15 दिवस माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले. माती परीक्षणासाठी जे काही खड्डे खोदायचे होते, ते काम पूर्णत्वाला गेल्याने 3 दिवसांपूर्वी काम थांबवण्यात आले. बोअरिंगच्या मशीन देखील आता तेथून हलवण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्त माघारी बोलवण्यात आला आहे. माती परिक्षणाचा अहवाल दोन महिन्यांनी येणार आहे.
बारसू रिफायनरी माती परीक्षण अहवाल दोन महिन्यांनंतर येणार
