पुणे
बारामती शहराला आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.पावसापेक्षा वाऱ्याचा वेग प्रचंड होता. वेगवान वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला.
गेल्या आठवडाभरापासून बारामतीत सूर्य आग ओकतो आहे. तापमान 40 अंश सेल्सीअसच्या पुढे गेले आहे. असह्य उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळपासून वातावरणात कमालीची उष्णता होती. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. चारच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुरु झाले. पाठोपाठ जोरदार पावसाने हजेरी लावली. पाच वाजेपर्यंत पाऊस आणि सोबतच सोसाट्याने वाहणारा वारा अशी स्थिती शहरात होती. अचानक जोरदार पाऊस झाल्याने कोणतीही पूर्वतयारी न करता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी दैना उडाली.
बारामतीला मुसळधार पावसाने झोडपले
