बीड- बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ३२ जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांना मिळाल्यांनतर अधिकार्यांनी घटनास्थळी जावून बालविवाह रोखला.
आरोपींमध्ये नवरी, नवरदेवाच्या आई-वडिलांसह फोटोग्राफर, आचारी, लग्न लावणारा ब्राह्मण आणि काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ग्रामसेवक यांनी आष्टी ठाणे गाठून फिर्याद दिली. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून ३२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये बालविवाह रोखला! ३२ जणांवर गुन्हा दाखल
