बीड- जिल्ह्यात या मे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये ३७ बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन ( केंद्रीय उपक्रम) आणि प्रशासनाला यश आले. बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत असल्याची नोंद शासन दरबारी आहे. ही वाढती आकडेवारी कमी करण्यासाठी प्रशासन आणि चाईल्ड लाईन कामाला लागले आहेत.
बीड जिल्ह्यात आजदेखील एक बालविवाह चाईल्ड लाईन आणि ग्रामसेवकाने रोखला. दरम्यान बालविवाहाची भीषणता बीड जिल्ह्यात पाहायला मिळत असताना आता बालविवाह रोखण्यात प्रशासनाने चाईल्ड लाईनच्या मदतीने पाऊल उचलले आहे. प्रशासकीय अधिकारी चाईल्ड लाईनच्या मदतीने ग्राउंडवर फिरत असतात. जिथे माहिती मिळेल तिथे जाऊन संबंधित पालकांचे समुपदेशन करून हे होणारे बालविवाह रोखण्यात येत आहेत.