लंडन:
बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे २०२० मध्ये त्यांनी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना एका कर्ज प्रकरणात मदत केली होती. या प्रकरणी अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आता ते येत्या जूनपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून पदावर कायम राहतील. शार्प यांच्या राजीनाम्यानंतर बीबीसी बोर्ड आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला रिचर्ड यांचा निर्णय मान्य आहे. शार्प हे बँकर व ‘रॉयल अकादमी ऑफ आर्टस’चे माजी अध्यक्षही आहेत. जानेवारी २०२१ मध्ये त्यांची बीबीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. कंझरेटिव्ह पक्षाचे देणगीदार रिचर्ड शार्प यांनी २०२१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी कर्जाची व्यवस्था करण्यास मदत केली होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बीबीसी कर्मचाऱ्यांना संबोधित केलेल्या मेमोमध्ये शार्प म्हणाले की, ‘माझा कर्जाची किंवा हमीची व्यवस्था करण्यात हात नाही. मी कोणत्याही वित्त पुरवठ्याची व्यवस्था केली नाही. मी केवळ पंतप्रधानांचे चुलत बंधू सँग ब्लिध यांची कॅबिनेट सचिवांशी ओळख करून दिली. माझी नियुक्ती गुणवत्तेच्या आधारावर झाली होती. यावर माझा ठाम विश्वास आहे.