बोअरवेलमध्ये पडून पाच
वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर – अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीत एक पाच वर्षांचा मुलगा हा १५ फुट बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबीच्या साह्याने या मुलाला बाहेर काढण्यात आले. मात्र या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. साडे आठ तास हा लहान मुलगा बोअरवेलमध्ये अडकला होता.
सागर बारेला (वय ५) असे बोअरवेलमध्ये पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सागर हा ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. या घटनेमुळे कोपर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. सागर हा सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बोअरवेलजवळ खेळत असताना येथील उघड्या बोअरवेलमध्ये तो पडला. ही बोअर १५ फूट खोल होती. सागर बोअरवेलमध्ये पडताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. मुलाच्या मृत्युमुळे ऊसतोडीसाठी इथे आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Scroll to Top