बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना वाचवणारे ‘उंदीर खाण कामगार’

डेहराडून

उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना ‘उंदीर खाण कामगारांनी’ वाचवले. या कामगारांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. वकील, मुन्ना, फिरोज, ,मोनू, नसीम, इर्शाद, अंकुर, राशीद, जतिन, नासिर, सौरव आणि देवेंद्र अशी या १२ उंदीर खाण कामगारांची नावे आहेत. १५ मीटरच्या उत्खननात मोठमोठी यंत्रे निकामी झाली. यावेळी परदेशी तज्ज्ञही चिंतेत असताना या १२ जणांनी काम तडीस नेले आणि सर्व ४१ कामगार सुखरूप बाहेर पडले. या सर्व शूरांमुळेच हे कठीण काम शक्य झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top