लंडन – ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणे आता महाग होणार आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून ब्रिटनच्या विद्यार्थी व्हिसा शुल्कात १२७ पौंडांनी वाढ होणार आहे.त्याचप्रमाणे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या व्हिजिट व्हिसासाठी १५ पौंड जादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळे बाहेरील देशांतून विद्यार्थी शुल्कासाठी अर्ज करण्याचे ४९० पौंड इतके होणार आहे.
ब्रिटनमधील सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली आहे. या वाढीव पगारासाठीचा निधी गोळा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने स्थलांतरितांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य सुविधेसाठीच्या शुल्कात वाढ करायचा निर्णय घेतला आहे. स्थलांतरितांना सार्वजनिक आरोग्य सुविधा आवश्यक आहेत; कारण खासगी उपचारांची किंमत खूपच जास्त आहे; पण आता सार्वजनिक आरोग्य सुविधाही महागणार असल्याने नव्याने येणाऱ्या स्थलांतरितांपुढे पेच निर्माण झाला आहे.ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जुलै महिन्यातच या वाढीसंदर्भात सूतोवाच केले होते.
ब्रिटनच्या व्हिसा शुल्कात ४ ऑक्टोबरपासून वाढ
