लंडन – ब्रिटनमधील घरगुती वस्तुंच्या किरकोळ विक्री व्यवसायातील एक नामांकित नाव समजल्या जाणार्या ‘विल्को ‘ कंपनीने आपली सर्व ४०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही दुकाने बंद होणार असल्याने सुमारे १२,५०० कर्मचारी यामुळे बेरोजगार होणार असल्याची माहिती जीएमबी युनियनचे पदाधिकारी नदीन हॉटन यांनी दिली.
नदीन हॉटन यांनी सांगितले की,ब्रिटनमधील विल्कोची सर्व दुकाने ऑक्टोबरमध्ये बंद होणार आहेत.मात्र त्याआधी कंपनी पुढील आठवड्यात शुक्रवारपासून आपली दोन वितरण केंद्रे बंद करणार आहे.त्यामुळे १२,५०० कर्मचारी नोकरीपासून वंचित राहणार हे स्पष्ट होत आहे.गेल्या महिन्यापासून या कंपनी आर्थिक आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे.आठवडाभरापूर्वी अनेक किरकोळ विक्रेते आपल्या वस्तूंची आगाऊ ऑर्डर देण्यासाठी कंपनीकडे गेले होते.पण त्यांना ऑर्डर मिळाल्या नाहीत.या कंपनीच्या दुकानांमधून हार्डवेअरपासून सर्व घरगुती सामानाची विक्री होते.अशी ४०० दुकाने ब्रिटनच्या पॉश भागात उभारली आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल १.२ अब्ज पौंड इतकी आहे. १९३० मध्ये कंपनीचे पहिले हार्डवेअरचे दुकान सुरू झाले होते.त्यानंतर मोठ्या चिकाटीने विल्कोने आपली मोठी साखळी निर्माण केली.पण आता ही व्यवसायाची शृंखला तुटणार आहे.ब्रिटनच्या कठिण आर्थिक वातावरणात ही कंपनी तग धरू शकलेली नाही.
ब्रिटनमधील ‘विल्को’ कंपनीची सर्व ४०० दुकाने बंद होणार
