लंडन : चिनच्या मालकीचे असलेले टिकटॉक एप ला सुरुवातिपासूनच विरोध होत असतानां, ब्रिटीश सरकारकडून टिकटॉकवर नवीन बंदी लागू करण्यात आली आहे. यूकेच्या संसदेने सुरक्षेच्या कारणास्तव आणि राष्ट्रीय सायबर आणि माहिती सुरक्षा एजन्सीच्या शिफारशीवरून चीनच्या व्हिडिओ शेअरिंग एप टिकटॉकच्या वापरावर सरकारी उपकरणांवर बंदी घातली आहे.
खासदार आणि संसदेच्या इतर कर्मचाऱ्यांना अधिकृत वाय-फाय कनेक्शनशी जोडलेल्या उपकरणांवर टिकटॉक वापरण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे सरकारी निवेदनात म्हटले आहे. तसेच इतर वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर टिकटॉक वापरण्यासाठी त्यांचा मोबाइल डेटा वापरावा लागेल, त्यांना वाय-फायद्वारे ही सेवा मिळणार नाही. चीनच्या मालकीची ही शॉर्ट व्हिडीओ सेवा सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते या भीतीने ब्रिटनने टिकटॉकवर बंदी घातली. ब्रिटिश सरकार
टिकटॉक ची मालकी असलेलय कंपनीबाबत साशंक आहे. आपला इतिहास किंवा वापरकर्त्यांबद्दलचा इतर डेटा चीनी सरकारला देऊ शकते किंवा चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू शकते. यासाठी ब्रिटन मध्ये आता संपूर्ण सरकारी वापरावतील साहित्यांवर टिकटॉकला बंदी घालण्यात आली आहे.