मुंबई- महाराष्ट्र भूषण व प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना आज भाऊबीजेनिमित्त ओवाळून आशीर्वाद दिले. आशा भोसले गेली अनेक वर्षे शेलार यांना भाऊबीजेला ओवाळतात आणि रक्षाबंधनाला राखी बांधतात. दरम्यान, शेलार यांनी आशा भोसलेंना दिवाळी पूर्वीच एक अनोखी भेट दिली आहे. त्यांनी वांद्रे पश्चिम रेक्लमेशन येथे त्यांच्या नावाने ‘आशा सरगम सागर’ या नावाने एक सुंदर उद्यान तयार केले आहे. यात त्यांची छायाचित्रे ही लावली आहेत. रोज या बागेत त्यांची मराठी- हिंदी गाणी ऐकण्याची सुविधा आहे. या उद्यानाचे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आशा भोसलेंच्या हस्ते लोकार्पण केले होते.
