भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा नवीन कार्यकारिणीमध्ये 16 उपाध्यक्ष

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या नव्या प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत 16 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 16 चिटणीस, 64 कार्यकारिणी सदस्य, 264 विशेष निमंत्रित सदस्य आणि 512 निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.
बावनकुळे यांनी सांगितले की, उपाध्यक्षपदी माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे , महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र) संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण ) हेमंत म्हात्रे (ठाणे ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top