मुंबई- भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मुंबई कार्यकारिणी बैठक उद्या पार पडणार आहे. ही बैठक मुंबई अध्यक्ष अॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या बैठकीला भाजपाचे खासदार, आमदार, मुंबई पदाधिकारी, प्रवक्ते, मुंबई कार्यकारिणी, विशेष निमंत्रित, मुंबईत राहणारे प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रीय परिषद सदस्य, मोर्चा सेल, मुंबई अध्यक्ष, नगरसेवक तसेच जिल्हा अध्यक्ष व महामंत्री उपस्थित राहणार आहेत. ही कार्यकारिणी बैठक रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत दादर येथील भाजपा कार्यालयात होणार आहे.
भाजपा कार्यकारिणीची मुंबईत बैठक
