तेलंगणा –
भाजपाच्या माजी आमदार आणि कर्नूल येथील अलुरूच्या भाजपा प्रभारी नीरजा रेड्डी यांचे रविवारी अपघाती निधन झाले. हैदराबादहून कर्नूल येथे जात असताना तेलंगणातील बीचुपल्ली येथे नीरजा यांच्या कारचा टायर फुटला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर जोगुलांबा गढवाला जिल्ह्यातील जिंकलापल्ली मंडळाजवळ झाला.
या अपघातात नीरजा यांचा मृत्यू झाला. नीरजा रविवारी राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून हैदराबाद ते कर्नूल असा प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या कारचा टायर अचानक फुटल्याने कार रस्ता दुभाजकाला धडकली. या धडकेत कार पलटी झाली. या अपघातात नीरजा यांच्या डोक्याला तसेच शरीराला गंभीर दुखापत झाली. चालू असताना त्यांचे निधन झाले.