ठाणे- भिवंडी तालुक्यातील पडघा येथील एका तरुणाचा भातसा नदीत बुडून मृत्यू झाला. सूरज शशीराव डोंगरे (वय २७) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी (४ मे) दुपारी सूरज आपल्या मित्रांसोबत कळंबोली गावानजीकच्या भातसा नदीत आंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडुन मृत्यू झाला. पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह लातूर येथील त्याच्या गावी नेण्यात आला.
भातसा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
