नवी दिल्ली – भारताचा तरुण बुध्दीबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनला हरविले. क्लासिकल चेस प्रकारात प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यात एकूण चार सामने झाले. त्यातील पहिले तीन सामने अनिर्णित राहिले. तर चौथ्या सामन्यात प्रज्ञानंदने कार्लसनवर मात केली. १८ वर्षीय प्रज्ञानंद या सामन्यात सफेद मोहरे घेऊन खेळत होता.त्याने कार्लसनला हरवून त्याला या स्पर्धेत पाचव्या स्थानावर ढकलले. प्रज्ञानंदने या स्पर्धेत आतापर्यंत ५.५ गुण मिळविले आहेत.