नवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्थेपुढे २०२३ मध्ये वर्षभर अनेक आव्हाने होती. जागतिक मागणी कमी राहिल्यामुळे पेट्रोलियम, दागिने आणि रत्ने यासारख्या महत्वाच्या क्षेत्राच्या निर्यातीत घट दिसून आली.परिणामी सलग सातव्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण झाली आहे.या महिन्यात देशाची निर्यात ६.८६ टक्क्यांनी ३४.४८ अब्ज डॉलर्स झाली.
त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात भारताची वित्तीय तूट फारच कमी म्हणजे २४.१६ अब्ज डॉलर्स होती. परंतु गेल्या जुलै महिन्याच्या तुलनेत २०.६७ अब्ज डॉलर्स इतकी तूट म्हणजे जास्तच आहे.वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी काल निर्यातीबाबतची आकडेवारी जाहीर केली.यावेळी बर्थ यांनी सांगितले की, देशाच्या आयातीमध्येही यंदाच्या ऑगस्ट महिन्यात सलग नवव्या महिन्यात घट दिसून आली आहे.गेल्या वर्षी याच महिन्यात आयातीचा ६१.८८ अब्ज डॉलर्स इतका होता. तर यावर्षीची आयात ५८.६४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच ५.३ टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षीच्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंतची निर्यात ११.९ टक्क्यांनी १७२.९५ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.जुलै महिन्यात भारताच्या निर्यातीत १५.८८ टक्क्यांनी घट झाली आहे.