भारताच्या नीतू घंघासला सुवर्णपदक

नवी दिल्ली- दिल्लीमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघासने सुवर्ण कामगिरी केली. 48 किलो वजनी गटात नीतूने मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंगचा 5-0 ने दारुण पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. याआधी शनिवारी नीतू घंघासने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.

Scroll to Top