नवी दिल्ली- मागील ११ वर्षात प्रत्येक भारतीयांचा घरगुती खर्च अडीच पटीने वाढला आहे.आश्चर्याची बाब म्हणजे लोक आता खाण्यापिण्याच्या वस्तूंवर कमी खर्च करून अन्य कामासाठी भरपूर खर्च करताना दिसत आहेत. सरकारच्या खप निर्देशांकाच्या सर्व्हेमधून ही माहिती उघड झाली आहे.
केंद्राच्या सांख्यिकी व प्रकल्प अंमलबजावणी खात्याने ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान देशात सर्व्हे केला होता.हा सर्व्हे दर पाच वर्षांनी केला जातो. मात्र आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे कारण सांगत सरकारने २०१७-२०१८ मधील सर्व्हे जाहीर केला नव्हता.त्यानंतर आता पाच वर्षांचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे.या सर्व्हेतून अशीही माहिती समोर आली आहे की आता शहर आणि ग्रामीण भागातील खर्चातील तफावत कमी झाली आहे.
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण २,६१,७४६ घरांमधील माहिती या सर्वेक्षणासाठी गोळा करण्यात आली होती. यापैकी १,५५,०१४ घरे ग्रामीण भागातील आणि १,०६,७३२ शहरी भागातील होती.