भारतीय मसाले वापरून बनवलेली कर्करोगावरील औषधे बाजारात येणार

चेन्नई – भारतीय मसाल्यांमुळे जेवणाची चव तर वाढतेच, पण असे अनेक मसाले आहेत जे कर्करोगासारख्या आजारांवर रामबाण उपाय ठरतात.आयआयटी मद्रास येथील संशोधकांनी अशा काही भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे,जे कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. या मसाल्यांचा वापर करून औषधी गुणधर्म असलेली औषधे २०२८ पर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे आयआयटी मद्रासच्या अधिकाऱ्यांनी काल रविवारी सांगितले.

आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन म्हणाले की, भारतीय मसाल्यापासून बनवलेल्या नॅनोमेडिसिनद्वारे फुफ्फुस,स्तन,कोलन,ग्रीवा, तोंड आणि थायरॉईडमधील कर्करोगाच्या पेशींवर परिणाम दिसून आला आहे. ही औषधे सामान्य पेशींवर सुरक्षित असल्याचे आढळून आले.संशोधक सध्या सुरक्षा आणि किमतीच्या समस्या सोडवण्यावर काम करत आहेत.

या औषधांचा प्राण्यांवर अलीकडेच यशस्वी अभ्यास करण्यात आला आहे. २०२७ -२८ पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन केले जात आहे. ‘भारतीय मसाल्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र, त्यांचा उपयोग आणि वापर मर्यादित आहे. नॅनो-इमल्शन फॉर्म्युल्यामुळे या मर्यादांवर मात करता येऊ शकते.नॅनो-इमल्शनची स्थिरता विचारात घेणे महत्त्वाचे होते आणि हे सूत्र आमच्या प्रयोगशाळेत स्वीकारले गेले. याचा अभ्यास आमच्या प्रयोगशाळांमध्ये सुरूच राहतील.’असे नागराजन म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top