भारतीय वंशाचे रवी चौधरी
अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. ते आता अमेरिकेच्या वायूदलाची कारभार पाहणार आहेत. रवी चौधरी यांचे हे पद पेंटागनमधील सर्वोच्च पदांपैकी एक आहे.

एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ म्हणून यापूर्वी रवी चौधरी यांनी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांची जबाबदारी सांभाळली आहे. रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. चौधरी हे १९९३ ते २०१५ या काळात एअरफोर्सचे सक्रिय सदस्य होते.या कालावधीत त्यांनी ऑपरेशन आणि फंक्शनल अशा दोन डिव्हीजनचे नेतृत्व केले आहे.सी-१७ चे ते पायलटदेखील होते.

तसेच अफगाणिस्तान आणि इराक युद्धातील अनेक ऑपरेशन्समध्ये ते सहभागी होते. इराकमध्ये बरेच दिवस ते कार्यरत होते.चौधरी एविएशन इंजिनिअरदेखील आहेत.अमेरिकेच्या हवाई दलाला लेटेस्ट टेक्नाॅलाॅजी देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
ओबामा यांच्या कार्यकाळात रवr चौधरी हे प्रेसिडेंट अ‍ॅडव्हायजरी कमिशनचे सदस्य होते.

Scroll to Top