भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूची अमेरिकन अधिकाऱ्याने खिल्ली उडवली

वॉशिंग्टन

अमेरिकेच्या एका सिएटल पोलिस अधिकाऱ्याने भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूची खिल्ली उडवली. याबद्दल सिएटल पोलिसांनी त्या अधिकाऱ्याविरुद्ध तपास सुरू करत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन भारताला दिले. सिएटल पोलिस विभागाने या घटनेचा एक व्हिडिओ सोमवारी प्रसिध्द केला. ज्यामध्ये डॅनियल ऑर्डरर या अधिकाऱ्याचा आवाज एकू येत आहे. तो भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूची खिल्ली उडवत असल्याचे समजते. सिएटल पोलिस युनियनचे उपाध्यक्ष डॅनियल ऑर्डरर हा त्यांच्या अध्यक्षांशी बोलत होता. यादरम्यान ऑर्डरर जान्हवीच्या मृत्यूबद्दल बोलताना हसू लागला आणि तिच्या मृत्यूची किंमत म्हणून ११ हजार डॉलर्सचा चेक लिहा,असे म्हणाला. ही घटना अतिशय धक्कादायक आणि निंदनीय असल्याचे सिएटल पोलिसांनी म्हटले आहे.

२६ वर्षीय जान्हवी कंदुला हिचा २३ जानेवारीला अमेरिकेतील रस्त्यावर अपघात झाला. ही भारतीय तरूणी अमेरिकेत शिक्षण घेत होती. ती नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या सिएटल कॅम्पसमध्ये शिकत होती. जान्हवीचा मृत्यू अमेरिकेतील स्थानिक पोलिसांच्या भरधाव गाडीने धडक दिल्याने झाला होता. या प्रकरणाबाबत चौकशी करावी असे आवाहन भारताने अमेरिकेला केले होते. भारताने ट्विटरच्या माध्यमातून या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्य़ाची विनंती केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top