भारतीय स्टार्टअप्सकडे गुंतवणुकदारांची पाठ

नवी दिल्ली:

भारतीय स्टार्टअप्ससाठी मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी घट झाली आहे. एप्रिलमध्ये निधी आणि डील्सची संख्या नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले. भारतीय स्टार्टअप्समधील एंजल गुंतवणूक आणि वेंचर कॅपिटल फंडिंग एप्रिलमध्ये 58 डील्समध्ये 381 मिलियन डॉलर इतके होते. एका संशोधनानुसार नऊ वर्षांतील हा सर्वात कमी निधी आहे. त्यामुळे भारतीय स्टार्टअप्सकडे गुंतवणुकदारांची पाठ फिरवल्याचे दिसून येते. यापूर्वी, एप्रिल 2014 मध्ये सर्वात कमी आकडा होता. एप्रिल 2022 मध्ये, भारतीय स्टार्टअप्सनी एकूण 3.3 अब्ज किमतीचे 146 करार केले. याच तुलनेत, 2023 मध्ये आतापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम एकट्या एप्रिल 2022 मध्ये नोंदवलेल्या रकमेच्या जवळपासही नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top