भीमा कोरेगाव प्रकरणी गोन्साल्विस, फरेराचा जामीन कोर्टाने राखून ठेवला

नवी दिल्ली :भीमा-कोरेगावच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला.

गोन्साल्विस आणि फरेरा यांनी ज्या आदेशाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना डिफॉल्ट जामीन नाकारला होता त्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आरोपींनी युक्तिवाद केला की निकालात त्रुटी होती आणि परिणामी, त्यांना जामीन मिळावा अशी प्रार्थना केली होती. यावर आज याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील रेबेका जॉन यांनी सांगितले की, आरोपी २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.दोन्ही आरोपी ४ वर्षे ४ महिने न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टाच्या अहवालानुसार या खटल्याला आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

Scroll to Top