मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्य पातळीवर कृषी विभागाचा डॅशबोर्ड तयार करण्याच्या संदर्भात
बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा हात खिशात असल्यावरून ‘मंत्री महोदयांनी खिशातून हात काढावा’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केले. पाटलांच्या या वक्तव्यावरून सभागृहात एकच हशा पिकला.
राज्य पातळीवर कृषी विभागाचा डॅशबोर्ड तयार करायचा. त्याच्यावर सर्व लायसन्सधारी विक्रेते, कंपन्या, वितरक, उत्पादक हे असतील. यामुळे शेतकऱ्यांना एका क्लिकवर खते, औषधे आणि त्याच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती मिळेल, असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी जयंत पाटील यांनी हरकत घेतली आणि मंत्री महोदयांनी खिशातून हात काढावा, असे ते बोलले. जयंत पाटलांच्या या हरकतीनंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. तर पाटलांनी हरकत ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, हात काढल्याने उत्तर बदलणार नाही, असे जयंत पाटलांना म्हणाले. दरम्यान, यावर उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, जयंत पाटील यांचे माझ्यावर एवढे बारीक लक्ष आहे याचा अर्थ माझ्यात नक्की काही तरी आहे.