थिरुअनंतपुरम – केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील सरकारा देवी मंदिर परिसरात असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेबाबात केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने संघ शाखेतील पोलिसांना मंदिर परिसरात सामूहिक सराव आणि शस्त्र प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हे मंदिर त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत येते. मंदिर परिसरात चालू असणाऱ्या संघाच्या प्रशिक्षण शिबिराबाबत मंदिरात येणाऱ्या भाविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत संघाने मंदिराच्या जागेचा अनाधिकृतरित्या ताबा घेऊन तिचा जागेचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. तसेच संघाच्या शिबिरामुळे भाविकांना खासकरून महिलांना आणि लहान मुलांना दर्शन करण्यात अडचण येते, असेही याचिकेत म्हटले होते.
या याचिकेच्या सुनावणीनंतर केरळ उच्च न्यायालयाने आरएसएस शाखेतील पोलिसांना मंदिर परिसरात सामूहिक सराव आणि शस्त्र प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाने मंदिर प्रशासनालादेखील सूचना दिल्या की, कोणत्याही प्रकारच्या सामूहिक सरावासाठी किंवा शस्त्रांच्या प्रशिक्षणासाठी मंदिर परिसराचा वापर करण्यास परवानगी देऊ नये.
मंदिरातील संघाच्या शाखेला प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश
