बेल्लारी – ‘द केरळ स्टोरी’सारख्या कलाकृतीतून दहशतवादाचा भयंकर चेहरा समाजासमोर उघडा पाडण्यात आला आहे. मात्र मतांसाठी काँग्रेस ‘केरळ स्टोरी’ला विरोध करीत आहे,असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात, आज पंतप्रधान मोदी यांची बेल्लारी येथील पालिका शाळेच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर काँग्रेसचा समाचार घेताना त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या केरळ स्टोरी सिनेमाचा उल्लेख केला. ते म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादाचा एक भयंकर चेहरा समोर आला आहे. बॉम्ब, बंदूक आणि आणि गोळीबाराचे आवाज कानावर पडत आहेत. त्याचबरोबर समाजाला आतून पोखरणार्या दहशतवादी षड्यंत्राचा मात्र आवाज येत नाही. दहशतवाद्यांच्या षड्यंत्रांवर बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ यात हेच भयंकर सत्य दाखवण्यात आलेले आहे. दहशतवादाचा पर्दाफाश या सिनेमातून करण्यात आला आहे. परंतु दहशतवादी प्रवृतींना पाठीशी घालणारा काँग्रेस पक्ष केरळ स्टोरीला केवळ मतांच्या लाचारीचा विरोध करीत आहे, असा आरोप पंतप्रधानांनी केला आहे.
मतांसाठी ‘केरळ स्टोरी’ला विरोध पंतप्रधानांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
