मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेणार

मुंबई

मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर हा ब्लॉक सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत असेल. या कालावधीत ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सर्व लोकल सेवा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. अप जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर देखील उद्या सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत पनवेल, बेलापूर, वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील. त्याचबरोबर सीएसएमटीहून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील बंद राहतील. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा धावतील.