मुंबई :
मध्य रेल्वेच्या मुख्य मागार्वर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. तर, ट्रान्स हार्बर मार्ग आणि हार्बर मागार्वर ब्लॉक नसेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर रविवारऐवजी आज शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता.
मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत मुलुंडहून सुटणाऱ्या डाऊन धिम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वगळण्यात येतील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या/ अर्ध जलद सेवा कल्याण-मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.