नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तिहार तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांनी या दरम्यान, पत्नीच्या आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. तो त्यांनी आता मागे घेतला आहे. हा अंतरिम जामीन अर्ज मागे घेण्यास बुधवारी न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांना परवानगी दिली.
पत्नीच्या प्रकृतीचे कारण देत सिसोदिया यांनी अंतरिम जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ११ मे रोजी सुनावणी घेत, सिसोदिया यांच्या अंतरिम आणि नियमित जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने सिसोदीया यांना जामीन अर्ज मागे घेण्यासाठी देखील परवानगी दिली आहे.