नवी दिल्ली – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरणाच्या बाबतीत मोठा झटका बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी त्यांना जामीन देण्यास नकार दिला. राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला.
मनीष सिसोदिया कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जाणार आहेत. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. गुरुवारी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 मेपर्यंत वाढ केली. यापूर्वी, 31 मार्च रोजी दिल्ली न्यायालयाने सीबीआयने नोंदवलेल्या अबकारी धोरण प्रकरणात सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.