नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी संशयित आरोपी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची सीबीआय आणि ईडी चौकशी सुरु आहे. दरम्यान त्यांनी जमिनीसाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी १७ एप्रिल रोजी त्यांची सीबीआय व ईडी कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. आज दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा यक्तीवाद पूर्ण झाल्यांनतर न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. आता २६ एप्रिल रोजी ४ वाजता न्यायालय निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांच्या ईडी कोठडीत २९ एप्रिल तर सीबीआय कोठडीत २७ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मनीष सिसोदियांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण! निर्णय राखून ठेवला
