कोलकाता – पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. याप्रकरणाची सुप्रीम कोर्टाने 24 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तपास यंत्रणांनी अभिषेक यांची कोणतीही चौकशी आणि कारवाई करु नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला.
13 एप्रिल रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी आदेश दिले की, ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सी गरज पडल्यास अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करू शकतात आणि ही चौकशी लवकरात लवकर व्हावी. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय आणि ईडी अधिकाऱ्यांवर कोणताही एफआयआर नोंदवू नये, असे निर्देशही हायकोर्टाने बंगाल पोलिसांना दिले होते. या आदेशाविरोधात अभिषेक बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने सोमवारी दोन्ही आदेशांना स्थगिती दिली.
ममता बॅनर्जींच्या पुतण्याला दिलासा
