मराठा आरक्षणासाठी पिशोरच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चांगला आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर गावातील ग्रामस्थांनी तर मराठा आरक्षणासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तसा ठरावच ग्रामसभेत मंजूर केला. मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या या ठरावाला गावातील उमेश मोकाशे यांनी सूचक म्हणून तर अनुमोदक म्हणुन एजाजखा युसूफखा पठाण यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर हा ठराव पिशोरच्या सरपंच सरला डहाके, उपसरपंच बाळासाहेब जाधव आणि ग्रामविकास अधिकारी मोरस्कर यांच्या सहीने मंजूर करण्यात आला आणि तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे आत्महत्येसारख्या घटना घडू लागल्या आहेत. तरी या सर्वांगीण बाबीचा विचार करून लवकरात लवकर मराठा आरक्षण घोषित करावे अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. जर तसा निर्णय घेतला नाही तर यापुढील सर्व निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top