नवी दिल्ली – सीबीआयने दारु घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. केजरीवालांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सीबीआय, ईडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक झाली असून आता ते मला अटक करू शकतील. मला जबरदस्तीने अडकवण्याचा हा डाव आहे. जर मी अप्रामाणिक असेल तर जगात कोणीही प्रामाणिक नसल्याचे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणाले की, सीबीआय-ईडीने मनीष सिसोदियांवर आरोप केले की, त्यांनी पुरावे लपवण्यासाठी 14 फोन तोडले. 5 फोन ईडी आणि सीबीआयकडे आहेत. बाकीचे फोन एका कार्यकर्त्यांकडे असतात. ते नियमित फोन वापरत नाहीत. तपास यंत्रणांनीही न्यायालयात खोटे आरोप करून मनीष सिसोदिया यांचा जामीन रोखत आहे, मला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. मी चौकशीला जाणार आहे. अरविंद केजरीवाल भ्रष्ट असले तर या जगात प्रामाणिक कोणी नाही. भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर सीबीआय त्यांच्या सूचनांचे पालन करेल, सीबीआय व ईडीच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. मी वेगळ्या मातीचा आहे. या सर्वांचा मी सामना करण्यास तयार आहे. माझे शब्द कदाचित चुकीचे असतील परंतु तुमचे कर्म हे फुटके आहे,अशा शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, चंदन रेड्डी नावाचा कोणी तरी माणूस आहे. या लोकांनी त्याला एवढे मारले की, त्याला ऐकू येत नाही. त्याच्या कानाचा पडदा फाटला. सीबीआय-ईडी त्यांना काय उघड करायचे आहे? त्याला थर्ड डिग्री का दिली जात आहे? अरुण रेड्डी, समीर महेंद्रू आणि अजून किती लोक आहेत माहीत नाही, ज्यांचा छळ केला जात आहे आणि आमच्या विरोधात जबाब नोंदविले जात आहेत.
मला अडकवण्याचा कट केजरीवालांची हल्लाबोल
