मलिकांना दिलासा नाहीच! कोठडीत 14 दिवसांची वाढ

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे. दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत नियमित 14 दिवसांची वाढ झाली. मलिकांना जामिनासाठी आता नव्या खंडपीठापुढे दाद मागावी लागणार आहे.

नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे हायकोर्टाने शुक्रवारी मान्य केले असले तरी देखील त्यांना जामीन मिळाला नाही. त्यांच्या जामीनावर लवकर सुनावणी होईल, असे वाटत नाही.त्यांची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर सुरू होती. मात्र मकरंद कर्णिक यांची गोवा खंडपीठात बदली झाल्याने मलिकांना आता जामिनासाठी मुंबई हायकोर्टात नव्या खंडपीठापुढे दाद मागावी लागणार आहे. दरम्यान, ईडीने नवाब मलिकांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून मलिक हे तुरुंगात आहेत. मलिकांवर गंभीर आरोप असल्याचे कारण देत त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला होता.

Scroll to Top